गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत भाषिक वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, मुलूंड, बोरीवली, नालासोपारा याठिकाणी झालेला भाषिक वाद त्याचे व्हायरल झालेले व्हिडीओ आपण पाहिले असतील. आता असंच आणखी एक प्रकरण मुंबईच्या चारकोपमध्ये पाहायला मिळालं. चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी असलेल्या तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊ.