स्वारगेट बलात्कार प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी माध्यमांसमोर बोलताना आरोपीने पीडितेला ७५०० रुपये दिले, ही माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली दिली आहे. पीडितेने आरोपीकडून ७५०० रुपये घेतले असा दावा याआधी वकिलांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात सुनावणीदरम्यान याबाबत युक्तीवाद झालाच नसल्याची कबुली वकिलांनी दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर वकिलांनी सारवासारव केली.