संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, इतर गोष्टीत यंत्रणा तत्पर असते. केवळ देशमुख प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात हे जाणूनबुजून केलं जात आहे की काय? अशी शंका निर्माण होते, असं जरांगे म्हणाले.