अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे माजी आमदार बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीने धूलिवंदनाचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी रस्ते रंगवत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मालाला भाव देणे, दिव्यांगांचं मानधन अशा अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केल्यास प्रहार आंदोलनाचं शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.