सगळीकडे रंग, गुलाल आणि पिचकारीने होळी खेळली जाते. पण यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाची बोरी येथे दगडांनी होळी खेळली जाते. परंपरेनुसार या गावात एकमेकांवर दगडफेक करून होळीचा सण साजरा केला जातो. या यात्रेला शंभर वर्षाची परंपरा असल्याचे सांगितले जाते. होळीच्या दिवशी रंग खेळण्याऐवजी दगडफेकीची प्रथा या गावात आहे. यात्रेत दगडफेकीचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येतात. जखमीला औषध उपचार करण्याऐवजी संत गदाजी महाराजांच्या मंदिरात नेऊन त्या जखमीच्या जखमेवर संपूर्ण शरीरावर होळीची राख लावली जाते.