गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली. ‘माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर ते पक्षात नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. दरम्यान, यानंतर अखेर जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.