औरंगजेबाची कबर पाडली जावी, अशी मागणी काही संघटना आणि राजकीय नेत्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूवीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भूमिकेला विरोध केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं ते म्हणाले. त्याचबरोबर नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांनादेखील त्यांनी टोला लगावला आहे.