Raj Thackeray Post on Shiv Jayanti 2025: शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार? यावर अद्याप ठाम असं उत्तर समोर येऊ शकलेलं नाही. पण त्यामुळेच तमाम शिवप्रेमींना आपल्या लाडक्या राजाची जयंती दोन दिवशी साजरी करण्याची संधी मिळत असून ती पूर्ण उत्साहात साधताना महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमी दिसत आहेत. एकीकडे आज तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.