नागपूरमध्ये भडकलेल्या दंगलीत पोलीस उपायुक्त निकेतन कदम हे जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांच्याशी व्हिडीओ काॅलवरून संवाद साधत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. दरम्यान, दंगलीत तब्बल ३३ पोलीस जखमी झाले असून त्यात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची बाब देवेंद्र फडणवीसांनी आज यासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनात अधोरेखित केली.