Sunita Williams Returns to Earth: तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहिम नऊ महिन्यानंतर संपुष्टात आली आहे. दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.