Sunita Williams: अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल २८६ दिवसांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना तांत्रिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच राहावं लागलं.मात्र,अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे त्यांना पृथ्वीवर परत आणणारी SpeceX Crew Dragon Capsuleअमेरिकन सागरात उतरली आणि नासाच्या संपूर्ण टीमसह अवघ्या जगानं सुटकेचा निश्वास टाकला.