Praniti Shinde: नागपूर येथे झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे. “राक्षसांना रक्ताची गरज असते,त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे”,असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. तसेच “भाजपा धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतं”, असंही त्या म्हणाल्या आहेत.