Aurangzeb’s Tomb in Khuldabad: १४ फेब्रुवारीला देशभरात ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा औरंगजेब चर्चेत आला. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता, असं म्हटलं होतं. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज नगरमधील औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलनं, निदर्शनं केली जात आहेत. गृहमंत्र्यांचे शहर अशी ओळख असलेल्या नागपूरातील महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गटात संघर्ष पेटला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्याहून अधिक भागात संचारबंदी जाहीर केलेली असली तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणारा कायदा नेमकं काय सांगतो? याचा घेतलेला हा आढावा.