दिशा सालियान मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इतक्या वर्षानंतर याचिका दाखल करण्याचा उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आधी त्यांनी कोर्टत याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय मिळाला असता. दिरंगाई का झाली? आधी ओरंगजेब आणि दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राचे प्रश्न भरकटत आहेत, असंही मिटकरी म्हणाले.