अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची नाव घेत त्यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या पार्श्वभूमीवर दिशाचा मृत्यू झाला त्या ८ जून २०२० च्या रात्री नेमके काय घडलं होंत याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.