दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर त्याचे पडसाद आज विधान परिषदेतही पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे अनिल परब यांना उत्तर देताना भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी थेट उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना क्लिन चीट का दिली? असा जाबही त्यांनी विचारला.