कुणाल कामरा राजकीय व्यंगात्मक टिका करत असतो. त्याने आमच्यावरही टीका-टिप्पणी केली आहे. कुणालने जे गाणं केलं त्यावर काही लोकांना अस्वस्थ होऊन, स्टुडिओ फोडून, धमक्या देण्याची गरज काय आहे, असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसंच खारमधील दंगलखोरांना सोडणार का? असा प्रश्न त्यांनी गृहमंत्र्यांना केला आहे.