मुंबई येथील धारावीमधील सायन-धारावी लिंक रोडवर सोमवारी रात्री गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या आगीनंतर सिलेंडरचे अनेक स्फोट देखील झाले. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती दिली आहे. तसंच आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक असे जवळपास चार ते पाच सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीचा एकच भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.