स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने तो सध्या वादात सापडला आहे. या प्रकरणी आक्रमक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा शो झालेल्या द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरीही काहीही बोलता येणार नाही, असं म्हणत कारवाई होणार असल्याचं सांगितलं. या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामरानं एक पोस्ट करुन आपलं मत सविस्तर मांडलं आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चार पानी पोस्ट लिहिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टमध्ये त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील उल्लेख केला आहे.