छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतलं. तो गेल्या चार दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणात पळाला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन तेलंगणातून ताब्यात घेतलं. त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांशी संवाद साधला.