शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमधील अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असं असून, त्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, शिंदे गटाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.