विधीमंडळाच्या अर्थसंकल्यीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधकांमध्ये बराच वेळ शाब्दिक संघर्ष चालू होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. तसंच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या मुद्यांवर उत्तरं देताना फडणवीस यांनी शायरीतून उत्तर दिलं.