राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सदर महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास चालू असतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला आहे. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.