नागपूर दंगलीतील आरोपीच्या घरावर चालवलेला बुलडोझर, मालवणमध्ये लहान मुलाने क्रिकेट सामन्यादरम्यान केलेल्या कथित देशविरोधी नारेबाजी विरोधात आणि कुणाल कामराच्या टिप्पणीनंतर स्टुडिओ विरोधात केलेली बुलडोझर कारवाई किंवा ‘बुलडोझर न्याय’ सध्या चर्चेत आहे. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाला यातील दोन प्रकरणांत खडेबोल सुनावले आहेत. प्रशासकीयदृष्टीने देशात आजवर आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राचा प्रवास आता उत्तर प्रदेशाच्याच दिशेने सुरू असल्याची शंका या निमित्ताने येते. अवकाशात नऊ महिने अडकलेली सुनिता विल्यम्स सुखरूप पृथ्वीवर परतल्यानंतरही चर्चा औरंगजेबाच्या कबरीचीच होणार असेल तर मग महाराष्ट्राचा प्रवास आता ऱ्हासाच्या दिशेने सुरू झाला आहे का, अशीच शंका येते. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचा दृष्टिकोन…