गेल्या तीन आठवड्यांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. या दरम्यान, अनेक मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कबरीपासून कामरापर्यंत नेणारं हे अधिवेशन होतं, अशी खोचक टीका केली.