शिवसेनेचे (शिंदे गट) युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा मोठा दावा कनाल यांनी केला आहे. राहुल कनाल यासंदर्भातील पुरावे आज खार पोलिसांना देणार आहेत.