जळगावच्या वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन वरणगाव शहरात दाखल झाले. त्यावेळी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये जाताना गिरीष महाजन यांना ट्रॅकचा वरचा रॉड थेट डोक्याला लागला आणि त्यामुळे रक्तस्राव झाला. पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून गिरीष महाजन जखमी अवस्थेतच नाशिकडे रवाना झाले.