Lamborghini Car Accident in Noida: नोएडा येथे रविवारी संध्याकाळी एका लाल रंगाच्या आलिशान लँम्बोर्गिनी कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं. रस्त्याला लागूनच असणाऱ्या एका इमारतीसाठी हे मजूर काम करत होते. या अपघातानंतरचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात या कारचा चालक “इथे कुणी मेलंय का?” असा उलट प्रश्न करताना दिसत आहे.