Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. “तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा.मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे”, असं राज ठाकरे मेळाव्यात म्हणाले. आता राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.