पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर संघ मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांशी बातचीत केली. मोदींच्या या नागपूर भेटीनंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केलं होतं. मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातील असेल असं राऊत यांनी म्हटलं होतं. पाठोपाठ राऊत यांनी आज (२ एप्रिल) पंतप्रधान मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.