MNS Raju Patil Saracastic Banner Over Palava Bridge: कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा पुलाचे काम सुरू काही वर्षांपासून सुरु आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन ३१ एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे, असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?… की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील केला आहे.