Burhanpur Asirgarh Fort History: ‘छावा’ चित्रपटात मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर केलेला हल्ला दाखवण्यात आला आहे. छावा चित्रपटाची सुरुवातच बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून होते. बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या खजिन्याचे भंडार दाखवले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैनिकांसह बुऱ्हाणपूरवर आक्रमण करून येथील खजिना आपल्यासह नेला होता. त्यानंतर असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा पसरली. चित्रपट पाहून या अफवांमुळे बुऱ्हाणपूरमधील असीरगड किल्ल्याजवळ स्थानिकांनी फावडे, मेटल डिटेक्टर आणि टॉर्च घेऊन असिरगड किल्ल्यावर धाव घेतली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. असिरगड किल्ला मुख्यतः मुघल इतिहासाशी संबंधित आहे. शिवाय या किल्ल्याविषयी अनेक स्थानिक वदंताही प्रचलित आहेत. त्याच निमित्ताने या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न.