छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागात सरकारी गायरान जमिनीवर दोनशे कुटुंबं राहत होतं. महानगरपालिका अतिक्रमण विभागाने ही घरं पाडताच मागील आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात चूल मांडून या घरातील महिला बसलेल्या दिसत आहेत. याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी X खात्यावर पोस्ट करत काही गंभीर आरोप केले आहेत.