मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील बँकांमध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, असं निवेदन मनसेचे कार्यकर्ते बँकांना देत आहेत. तर याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील मनसेने दिलं आहे. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.