भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबीयांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशा अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दलही सुशांत भिसे यांच्या बहीण प्रियांका पाटील माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे.