पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी १० लाखांची अनामत रक्कम मागितल्यानंतर सदर महिलेला शेवटच्या क्षणी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिशा भिसे या महिलेचा मृत्यू ओढवला होता. भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर दोन दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात टीकेची झोड उठत आहे. काल रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र आज (५ एप्रिल) एक सविस्तर निवेदन जाहीर करत रुग्णालयाने तनिशा भिसे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे.