दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेलं प्रकरण पुन्हा घडू नये या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रुग्णालय प्रशासनाकडून एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे स्वर्गीय लता मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलेलं आहे. ते रुग्णालय नावाजलेल आहे. रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळं काही रुग्णालयाचं चुकीचं आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. कालचा जो प्रकार झासा तो असंवेदनशील आहेच. जे चुकीचं आहे, तिथं चुकीचं म्हणाव लागेल. परंतु, ती चूक सुधरावी लागेल, ती चूक रुग्णालयाने सुधारल्यास मला आनंदच आहे, असंही फडणवीस म्हणाले.