तनिशा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनामार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे. आज शरद पवार गटाकडून देखील आंदोलन करण्यात आलं. दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहुजी शक्ती सेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवर जाऊन अर्धनग्न आंदोलन सुरू केलं. रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पोलिसांनकडून देखील त्यांना खाली येण्याचं आवाहन केलं जात होतं.