भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीस सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांच्या मृत्यूला कुटुंबीयांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरलं आहे. यासंदर्भात आज भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते. रुग्णालय धर्मादाय करावं अशी मागणी सुशांत यांच्या बहिणीने केली आहे.