दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर आमदार सुरेश धस यांनी आरोग्य क्षेत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “सध्या जे काही प्रकार चालले आहेत, म्हणजे रुग्णालयांचं बिलं किती येतात? हे सर्व भयावह आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीने याची चिरफाड केली पाहिजे. तसेच पुण्याच्या घटनेत जर मुख्यमंत्री कार्यालयाचे फोन येऊन देखील दखल घेतली गेली नसेल तर रुग्णालय प्रशासनाला एवढी मुजोरी कशी? हा देखील प्रश्न आहे.