Ajit Pawar: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshk Hospital) प्रशासनाने गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. पैशांअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर काही संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले. आता या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे