Tanisha Bhise death case: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshk Hospital) प्रशासनाने गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. पैशांअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.अशातच आता या प्रकरणी भिसे कुटुंबाने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. अलंकार पोलीस स्टेशन येथे भिसे कुटुंबीयांनी जबाब नोंदवला आहे.