Sanjay Raut Latest: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन भाजपावर टीका केली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख एसंशि असा केला. तर याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे म्हणजे यूटी अर्थात यूज अँड थ्रो असं म्हटलं. या सगळ्याबाबत आता संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.