Eknath Khadse on Girish Mahajan: आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यात त्यांनी महिला IAS अधिकाऱ्याचा देखील उल्लेख केला. त्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.” मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला लोक जोड्याने मारतील”, असं महाजन म्हणाले. अशातच आता खडसे यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.