तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. तसंच आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांना नाही. खर्चाचं अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिलं जातं. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही, असंही केळकर म्हणाले. मात्र पत्रकारांच्या अनेक प्रश्नाचा भडीमार सुरू असतानाच केळकर हे पत्रकार परिषदेतून निघून गेले.