तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सर्वत्र टीका होत असताना रुग्णालयाचे विश्वस्त तथा वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने डिपॉझिट भरण्यास सांगू शकतात का? असे प्रश्न डॉ. धनंजय केळकर यांना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचं अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिलं जातं. त्यावरही डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही, असं डाॅ. केळकर यांनी स्पष्ट केलं.