Girish Mahajan:एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “अनिल थत्तेंनी क्लिप प्रकाशित केली आहे.त्यामध्ये म्हटलंय की,गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत.त्या महिलेचे नाव देखील मला माहिती आहे.”, असं खडसे म्हणाले होते. नंतर महाजन यांनी त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर खडसेंनी त्यांच्यावर वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. खडसेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर “पुढे काय-काय होतंय बघा”, असं महाजन म्हणाले आहेत.