दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर भाजपाच्य महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत डाॅ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड केली होती. त्यावरूव भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहून थेट सोम्या-गोम्या असा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचेच कान टोचले आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या या पत्रावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.