गुहागरमधील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आज शिवसेना (ठाकरे गटात) प्रवेश केला. सगळे कोकणचे सुपूत्र येथे हजर आहेत. महाभारतातील सगळी पात्रं येथे आहेत, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा दिली. सहदेव आता श्रीकृष्णाच्या जवळ आला आहे. सहदेव यांच्या येण्याने कोकणातलं युद्ध आपण जिंकणार, असंही राऊत म्हणाले.