भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तो रस्ता क्राँक्रीटचा करण्यात यावा या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत.